काँग्रेसच्या आमदारांनी भाजपनेत्याला चोपले
काँग्रेसचे दोन आमदार तीन वर्षांसाठी निलंबित
अहमदाबाद : गुजरात विधानसभेत बुधवारी काँग्रेसच्या आमदारांनी प्रचंड गोंधळ घालत भाजपच्या एका आमदाराला विधानसभेत मारहाण केली. सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप काही दिवसांपासून काँग्रेस आमदारांकडून होत आहे. भाजपच्या आमदारांना अध्यक्ष झुकते माप देतात असेही काँग्रेसचे म्हणणे होते. यावरून विधानसभेत गोंधळ सुरू होता. विधानसभेच्या अध्यक्षांनी मंगळवारीच काँग्रेसच्या 15 आमदारांना निलंबित केले होते. निलंबित सदस्यांना विधानसभेतील मार्शल्सनी सभागृहाबाहेर काढण्यात आले होते. या राडेबाजीमुऴे काँग्रेसच्या दोन आमदारांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
आमदार प्रताप दुधात यांनी केली मारहाण
काँग्रेस नेते अमित चवदा यांनी माफी मागितल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले. परंतु, त्यानंतर कृषिमंत्री आरसी फाल्दू आपल्या खात्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी करत असताना पुन्हा गोंधळ घातला. यावेळी भाजप आमदार बोलायला उभे राहिले असता काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला. भाजपचे जगदीश पांचाल यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काँग्रेसचे आमदार प्रताप दुधात यांनी त्यांना पट्ट्याने आणि माईकने मारहाण केली. प्रताप दुधात हे निकोल मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. सत्ताधारी आमदार विरोधकांना बोलू देत नाहीत, या रागाच्या भरात काँग्रेसचे आमदार विक्रम माडम यांनीसुद्धा माइक तोडला व निषेध नोंदवला. तर दुसरीकडे राजुलाचे आमदार अंबरीश डेर यांनीही भाजप आमदाराला मारहाण केली.