नवापूर । गुजरात राज्यात पंतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो गुजरात राज्यातील विविध सण उत्सवाचा पगडा गुजरात राज्याचा सीमेवर असलेल्या नवापूला आहे मकर संकरातीचा अगोदर पासुन पंतग विक्री व पंतग उडविणे सुरु होऊन जाते.पंतग उडविण्याची जणु स्पर्धाच लागते रंगबिरंगी पंतगानी आकाश सप्तरंग होऊन जाते प्रत्येक घरात तीळ,दाळ,शेंगदाणे,मुरमुरे गुळचे लाडु तयार झाले असुन बाजार पेठे व शहरातील काही भागात पंतग विक्रीची दुकाने लावली आहेत.नवापूरात दुकाने थाटली असुन पतंग व मांजा बनविण्याचा विक्रीतुन लांखोची उलाढाल होते.
मांजाचे भाव वाढले
दि 15 तारखेला संक्रांत असल्याने सर्वानाचा पतंगोत्सवाचे वेध लागले आहे. मुकेश तबलावाला, घनश्याम परमार यांचाकडे सालाबाला प्रमाणे पतंग व दोरा घासण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. नाँयलोन दोरा विक्री करण्याचे सुरुवाती पासुन या पंतग विक्रेत्यांनी टाळले आहे. मकर संक्रांतीचा पार्श्वभूमीवर अनेक बेरोजगार युवकांनी सुरत येथुन होलसेल,पंजा भावाने पंतग खरेदी करुन यंदा व मांजाचे भाव वाढले असुन तरी तरुण व तरुणींन मध्ये पंतग उडविण्याचा उत्साह दिसुन येत आहे दररोज सकाळ संध्याकाळ घरांचा छतांवर पतंग उडविण्यासाठी मुलांची गर्दी होत आहे.
रोजगाराची संधी उपलब्ध
पतंग लुटुन ते विक्री ही केले जातात अशातुन काही गरिब मुलांना रोजगार देखील मिळत असतो पतंग लुटणे व उडवणे हे दोघ चित्र व महत्व पाहायला मिळत असते विविध आकर्षित पतंगा पाहायला मिळत आहेत एक डोळा, दोन डोळा,तिरंगा, टायगर जिंदा है असे अनेक प्रकार असुन नरेंद्र मोदी, विविध सिनेनट, हिरोईनचे फोटो, सैराट चित्रपटातील आर्ची परश्या चे पतंग उपलब्ध असून चिमुकल्यांना अकार्षीत करीत आहे.. पाच रुपया पासुन दोनशे रुपया पासुन पतंगांची किंमत आहेत.