गुजराथी पंड्या बंधू होणार लवकरच ‘मुंबईकर’

0

मुबई। कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पंड्या बंधूंनी आपल्या अष्टपैलू कामगिरीतून मुंबई संघासाठी विजय खेचून आणला.आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणारे गुजरातचे हार्दिक पंड्या व कुणाल पंड्या बंधू आता मुंबईकर झाले आहेत. दोघांनी मुंबईच्या अंधेरी येथे वर्सोवात उच्चभ्रू वस्तीत घर घेतले आहे. हार्दिक आणि कुणालच्या वडिलांनी मुंबईकर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंबईतले हे आमचे पहिले घर असून माझ्या दोन मुलांनी स्वत:च्या कमाईतून ते घेतले आहे, याचा खूप आनंद आहे. लवकरच आम्ही गृहप्रवेश करू, असे हार्दिकचे वडील म्हणाले.

त्वरित मुंबईत येण्याची तयारी केलेली नाही
सर्व सुखसुविधांनी सुसज्ज असलेल्या टू बेड रुम किचनच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये माझी दोन्ही मुले आनंदात राहू शकतील. पण बडोद्यातून सध्या त्वरित मुंबईत येण्याची तयारी केलेली नाही. पण जेव्हा मुंबईत येऊ त्यावेळी स्वत:च घर म्हणून तेथे केव्हाही हवा तितका काळ आम्ही राहू शकतो, असेही हार्दिकचे वडील म्हणाले. नुकतेच कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पंड्या बंधूंनी आपल्या अष्टपैलू कामगिरीतून संघासाठी विजय खेचून आणला. मुंबई इंडियन्ससाठी हार्दिकने केलेल्या कामगिरीने मुंबईकरांनी त्याला आपलंस करून घेतलं आहे. मुंबईकरांचं प्रेम पाहून हार्दिकलानेही मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने अखेरच्या षटकात फटकेबाजी करून संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तर कुणाल पंड्याने कोलकाताच्या तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. मुंबईकडून नितिश राणाने अर्धशतकी कामगिरी केली होती.