शिक्रापूर । शिरूर तालुक्याच्या तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेमध्ये भारतीय संघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. यावेळी प्रशालेतील सोनू धृतराज, कोमल गायकवाड, राहुल कोकरे यांनी डॉ. आंबेडकर यांचा जीवनपट आपल्या भाषणातून व कवितेतून सादर केला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक सातकर, उपमुख्याध्यापक जगदीश राऊतमरे, पर्यवेक्षक राजाराम पुराणे, जनार्दन कोकरे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख शिवाजी आढाव तर मुख्याध्यापक माणिक सत्कार यांनी आभार मानले.