गुड्डया खून प्रकरण अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांच्याकडे सुपूर्द

0

धुळे । गुड्ड्या उर्फ रफीउद्दीन शेख याचा 18 जुलै रोजी निर्घुण खुन करण्रात आला. हत्त्याकांडाचा तपास लागावा याकरीता निष्णांत कायदेपंडीत व फौजदारी वकील उज्वल निकम यांची मुख्यमंत्र्यांनी विशेष सरकारी म्हणून नियुक्ती केली आहे. आज सकाळी 10.30 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी अ‍ॅड. उज्वल निकम व आमदार अनिल गोटे यांना बोलावून घेऊन तसे आदेश पारित केले.

धुळे शहरात यापुर्वी घडलेल्या 6-7 हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता कशाप्रकारे झाली व तपासात कशाप्रकारे त्रुटी ठेवण्यात आल्या आहे हे आमदार अनिल गोटे यांनी यापूर्वी लक्षात आणून दिले होते. सदर गुन्ह्यांना महाराष्ट्र संघटेत गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावण्यात आला आहे. परंतु तपासामध्ये आवश्यक ती गती पोलिस यंत्रणेने घेतली नसल्याने आमदार गोटेंनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. या हत्त्याकांडामागे एक सुनियोजित कट असून सदर हत्त्याकांड हे केवळ दोन टोळीतील युद्ध नसून यामागे काही राजकीय नेत्याचा हात असण्याचा शक्यता नाकारता येत नाही, असे आमदार गोटेंनी यांनी स्पष्ट केले.