धुळे । शहरातील गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्याच्या खुनाचा तपास आता विशेष चौकशी समितीकडून (एसआयटी) होणार आहे. एसआयटीची नियुक्ती गृहखात्याने केली आहे.
या चौकशी समितीच्या प्रमुखपदी हर्ष पोतदार या अधिकार्याची नियुक्ती झाल्याचे वृत्त आहे. त्याबाबत स्थानिक पोलिसांना सूचना मिळालेली नाही. एसआयटीमार्फत या खुनाची सखोल चौकशी होणार आहे. गुड्ड्या खून प्रकरणी गेल्या पंधरा दिवसांत पोलिसांनी विविध ठिकाणाहून खुनातील सहभागी मुख्य दहा आणि त्यांना मदत करणारे सहा अशा एकूण 16 जणांना अटक केली आहे. दरम्यान, सोमवारी गृहमंत्र्यांकडून एसआयटी स्थापन करण्याबाबत कार्यवाही केली गेली आहे. आठ जणांची ही समिती असणार आहे. त्याचे प्रमुख म्हणून हर्ष पोतदार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती आहे.