धुळे । शहरातील पारोळा रोडवर घडलेल्या गुंंड गुड्ड्या हत्याकांडातील आणखी एकाला धुळे पोलिसांनी दौंड तालु्क्यातील राहु येथून बेड्या ठोकल्या. त्याच्या मुसक्या आवळून विक्की उर्फ विक्रम रमेश चावरे याला आज धुळ्यात आणण्यात आले. दोनच दिवसापूर्वी ज्या पोलिस पथकाने मध्य प्रदेशातील खंडवा येथून एका आरोपीला उचलले होते. त्याच पथकाने ही कामगिरी बजावली. त्यामुळे त्या पथकाचे कौतुक केले जात आहे. ह्या पथकात आझाद नगर पोलिस ठाण्यातील पो.नि.दत्तात्रय पवार,एपीआय पी.जे.राठोड, हेेकॉ दीपक पाटील, पोना रमेश माळी,कुणाल पानपाटील, रवी राठोड आदिंनी सहभाग घेतला. काल रात्री भल्या पहाटे भर झोपेतच विक्कीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तो एका दुरच्या नातेवाईकाकडे गेला होता. ही कारवाई अधिक्षक एम.रामकुमार, अप्पर अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय अधिकारी हिंमत जाधव, एल.सी.बी. पीआय रमेशसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.