धुळे । गुड्ड्या हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला विक्की गोयर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. कुख्यात गुंड गुड्ड्या उर्फ रफियोद्दीन शेख याच्या हत्याकांडानंतर आरोपी फरार झाले होते. धुळे पोलिसांनी विशेष पथके तयार करुन शोध मोहिम सुरु केली आहे. याप्रकरणी 15 आरोपी या आधीच अटक करण्यात आली आहे.
हत्याकांडातील एक आरोपी विक्की उर्फ विक्रम शाम गोयर (वय 33) रा.अंबिका नगर,अरिहंत मंगल कार्यालयाजवळ,धुळे हा नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील मिताणे गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन एलसीबीचे पीआय रमेशसिंह परदेशी,एपीआय पी.जे.राठोड तसेच आझादनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने मिताणे गावात जावून सापळा रचुन विक्की गोयरला बेड्या ठोकल्या.पोलिस अधिक्षक एम.रामकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यातील आणखी दोन फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.