गुड न्यूज : अमेरिकेत करोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी

0

नवी दिल्ली – करोना व्हायरसला रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या लसीची अमेरिकेत मानवी चाचणी करण्यात आली आहे. अमेरिकेतील ही पहिली मानवी चाचणी आहे. या चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत. ज्यांना ही लस टोचण्यात आली, त्यांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसलेले नाहीत तसेच करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली, असे ही लस विकसित करणार्‍या मोडर्ना कंपनीने सोमवारी जाहीर केले.

आठ स्वयंसेवकांना लसीचे दोन डोस देण्यात आले. लस दिल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. मुख्य म्हणजे व्हायरसचा शरीरात होणारा फैलाव रोखण्यामध्ये ही लस अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले. प्रभावी लसीसाठी हीच सर्वात महत्वाची गोष्ट होती. दुसर्‍या टप्प्यात मोडर्ना ६०० तंदुरुस्त स्वयंसेवकांवर लसीची चाचणी करणार आहे. त्यानंतर जुलै महिन्यात तिसर्‍या टप्प्यात १ हजार लोकांवर चाचणी करण्यात येईल.