जेरुसलेम – जगभरात थैमान घालणार्या कोरोनासारख्या महामारीच्या उपचारासाठी अजूनही अधिकृत लसीचा शोध लागलेला नसतांना इस्राइलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी कोविड-१९ या रोगावर लसची निर्मिती केल्याचा दावा केला आहे. इस्राइलच्या जैविक संरक्षण संस्थेमध्ये कोरोना व्हायरसवर लस तयार करण्यात आल्याचे बेनेट यांचे म्हणणे आहे. नफ्ताली यांच्या दाव्यानुसार ही लस मोनोक्लोनल न्यूट्रॅलिटींगनुसार शरीरातील व्हायरसवर हल्ला करते आणि शरीरातच कोरोनाच्या विषाणूंचा नायनाट करते.
ेकोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत ३६ लाख ४२ हजार ०६६ लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी २ लाख ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. जगभरात थैमान घालणार्या कोरोनासारख्या महामारीच्या उपचारासाठी अजूनही अधिकृत लसीचा शोध लागलेला नाही. मात्र इस्त्रायलचे संरक्षण मंत्री नफताली बेनेट यांनी सोमवारी दावा केला की देशाच्या संरक्षण जैविक संस्थेने कोरोना विषाणूची लस बनविली आहे. ते म्हणाले की कोरोनाला रोखण्यासाठी अँटीबॉडी तयार करण्यात संस्थेने मोठे यश संपादन केले आहे. तसेच कोरोना व्हायरस लसीला विकसित करण्याचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. नफ्ताली बेनेट यांच्यावतीने याबाबत एक अधिकृत पत्रक देखील जारी करण्यात आले आहे. यात त्यांनी करोनावर लस शोधल्याबद्दल त्यांच्या संशोधकांचे अभिनंदन देखील केले आहे. शिवाय, याचे पेटंट मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत व्यावसायिक स्तरावर उत्पादन करण्यासाठी संपर्क साधण्यात येईल, असेही म्हटले आहे. इस्रायलमधील संशोधकांच्या या दाव्यामुळे आता संपूर्ण जगाला एक मोठा दिलासा मिळाला आहे.