गुढीपाडव्या निमित्त नववर्षाचे स्वागत

0

वाडा (संतोष पाटील) :  वाडा शहरातील नववर्ष स्वागत समितीच्यावतीने गुढीपाडव्याच्या दिवसाच्या भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.यात वारक-यांनी हरी नामाचा गजराचा सुर यावेळी आळविण्यात आला.शहरातील परळीनाका- पाटील आळी,वाडा स्टँड,खंडेश्र्वरी नाका,आगरआळी याभागात शोभायात्रा काढण्यात आळी नववर्ष स्वागतकरून राममंदिर या ठिकाणी गुढी शहरातील संजय पातकर यांच्या हस्ते उभारण्यात आली.या शोभायात्रेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा,भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार शांताराम मोरे,विवीध राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अशी माहीती वाडा शहरातील समिर अशोक म्हात्रे यांनी यावेळी दिली.