भडगाव- तालुक्यातील गुढे शिवारातील हाशाबाबा मंदिरावर गेल्या वर्ष भरापासून राहणार्या 50 वर्षीय जटाधारी साधू बाबांचा खून झाला असून त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी यापूर्वी दाखल केलेले खुनाचे कलम बदलवून 304 प्रमाणे नोंद केली असल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे म्हणाले.