भुसावळ। आपले परिवार वाचनालयातर्फे शहर व तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावीतील प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या गुणगौरव समारंभासाठी गुणगौरव, व्यवस्थापन, स्वागत, भोजन अशा विविध समित्या स्थापन करण्यात आल्या.
गुणगौरव समितीत सुनिल भिरुड यांसह बारा सदस्य, व्यवस्थापन समितीत भालचंद्र इंगळे यांसह अकरा सदस्य, स्वागत समितीत प्रमोद सरोदे, यतीन ढाके, प्रकाश चौधरी यांसह बारा सदस्य, भोजन समितीत जनार्दन बोंडे, सुभाष चौधरी यांसह अकरा सदस्यांचा समावेश असल्याचे समन्वयक शांताराम पाटील यांनी कळविले आहे.