गुणतिलक, फर्नांडोचा कसोटी संघात समावेश

0

कोलंबो । झिम्बावेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. कोलंबोत होणार्‍या या सामन्यासाठी 15 जणांच्या संघात धनुष्क गुणतिलकचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय विश्‍व फर्नांडो आणि दुष्मंत चमिराला संघात जागा देण्यात आली आहे. धनजंय डिसील्वाला मात्र या संघातून वगळ्यात आले आहे. जखमी असल्यामुळे नुवान प्रदीप आणि कुसाल परेराची संघात निवड करण्यात आलेली नाही. संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिनेश चंडीमलकडे सोपवण्यात आली आहे. अँजेलो मॅथ्यूजने 11 जुलैरोजी कर्णधारपद सोडले असून, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची संघातील जागा कायम आहे.

श्रीलंकेचा संघ : दिनेश चंडीमल (कर्णधार), उपुल थरांगा, धनुष्क गुणतलिक, निरोशान डिकवेला, दिमुथ करुनरत्ने, अँज्येलो मॅथ्यूज, असेल गुणरत्ने, रंगाना हेराथ, कुसाल मेंडीस, लाहिरु कुमारा, दिलरुवान परेरा, लक्ष्मण संदाकन, विश्‍व फर्नांडो, दुष्मंत चमिरा, सुंरगा लकमल.