चोपडा। येथील अखिल भारतीय गुर्जर एकता अभियानातर्फे चोपडा तालुका गुर्जर समाज ( सर्व पोटजांतीसह) बांधवांचा गुणगौरव सोहळा, गुणवंत सत्कार समारंभ रविवार 6 ऑगस्ट रोजी न .प. नाटयगृह चोपडा येथे आयोजित करण्यात आला आहे.
गुणवंत पाल्यांच्या पालकांनी पाल्यांच्या गुणपत्रकाच्या सत्यप्रत जमा कराव्यात असे आवाहन अखिल भारतीय गुर्जर एकता अभियानाचे संयोजक डॉ.आर.आर.पाटील, गुणगौरव समितीचे अध्यक्ष एस्.एच्. पाटील , उपाध्यक्ष सतीश पठार, सचिव विलास पाटील, सहसचिव श्रीराम पाटील यांसह समिती सदस्यांनी केले आहे. मोरया मेडिकल, नारायणवाडी,श्री दत्त डेअरी पंकजनगर, गुर्जर मोबाइल शॉपी, बाबा रामदेव पतंजली शॉपी येथे गुणपत्रक जमा करण्यात येणार आहे.