जळगाव । रविवारी दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी एम.जे.कॉलेज प्राचार्य उदय कुळकर्णी, भावेश भाटीया, अरविंद नारखेडे, बँकेचे ज्येष्ठ संचालक दादा नेवे, प्रिती मिनासे, बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, व्हा.चेअरमन डॉ.श्री.प्रकाश कोठारी, प्रा.विलास बोरोले, सुनिल पाटील, चंदन अत्तरदे, अनिकेत पाटील, संचालिका सुरेखा चौधरी, स्मिता पाटील, प्रबंध संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटकर, सहप्रबंध संचालक दिलीप देशमुख तसेच बँकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.