गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

0

खालापूर : खालापूर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खोपोली येथे राजेश्री शाहू महाराज सामाजिक सभागृहात खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील 10 वी व 12 वीमधील मराठी, इंग्रजी, हिंदी विद्यालयात यश संपादन केलेल्या 143 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी संपन्न झाला.

या गुणगौरव सोहळ्यास आमदार सुरेश लाड माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, नगराध्यक्षा सुमन औसरमल, संतोष बैलमारे, एच. आर. पाटील, अंकित साखरे, मनेश यादव, शिल्पा सुर्वे, प्रगती देशमुख, भावना पाटील, ऐश्वर्या खेडकर, खेमंत टेलर, कैलास म्हात्रे, भूषण पाटील, वैभव भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी 143 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.