गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करा!

0

शिरपूर । आपल्याला शिक्षण क्षेत्रातील नवीन बदलांचे ज्ञान मिळावे व सकारात्मक बदल व्हावा यासाठी शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिराच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांसाठी उपयोग झाला पाहिजे. वेगवेगळ्या समस्यांमुळे रोजचा ताणतणाव वाढत आहे, त्यातुन आपण मार्ग काढला पाहिजे. समस्यांमध्ये सुधारणा व्हायला हवी. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत चांगला माणूस म्हणुन घडवा. दर्जेदार शिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्र, प्रकल्पधारित पद्धतीचा वापर करा, असे प्रतिपादन तुषार रंधे यांनी केले. किसान विद्या प्रसारक संस्थेच्या सेवकांचे 35 वे शैक्षणिक शिबिर बोराडी येथील स्व. दादासाहेब विश्‍वासराव रंधे इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मास्युटिकल एज्युकेशन, बोराडी येथे नुकतेच झाले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशा रंधे, विश्‍वस्त लीला रंधे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, विश्‍वस्त रोहित रंधे, आर.एफ. पाडवी, महाराष्ट्र ग्रंथालय कमेटीच्या अध्यक्ष सारीका रंधे, शशांक रंधे, सदस्य शामकांत पाटील, संजय गुजर आदी उपस्थित होते. व्याख्याते वसंत हणकारे यांनी ’गर्वसे कहो हम शिक्षक है।’, बाबत, शिक्षकच खरे अर्थाने माणूस, समाज व देश घडवितो. दफ्तराचे ओझे ही विद्यार्थ्यांना भेडसावणारी मोठी समस्या आहे. त्यापेक्षा ज्ञानरचनावाद पद्धतीने त्याना समजेल अशा पद्धतीने अध्यापन झाले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधुन त्यांना प्रेरणा दिली तर त्यातुन त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ घडु शकतील. अध्यापनात आनंद, उत्साह पाहिजे. सैनिक देशाचे संरक्षण करतात तर, शिक्षक देश घडवितात दोघांचे कार्य मोठे आहे. हास्य हेच जीवन आहे, आयुष्यात समाधानाने जगायचे असेल तर, मनमुराद हसले पाहिजे, असे ते म्हणाले.