एरंडोल । गुणवत्ता हीच खरी समाजाची ओळख असून श्रीमंती आहे असे प्रतिपादन प्रसिध्द कवी तथा लेक वाचवा अभियानाचे पुरस्कर्ते प्रा.वा.ना.आंधळे यांनी केले. वंजारी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. सत्कारामुळे विद्यार्थ्याना प्रोत्साहन मिळून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढत असतो.ज्याप्रमाणे धनुष्याची दोरी जितकी मागे खेचली जाईल तितका बाण दूर जात असतो. त्याचप्रमाणे अपयश जेव्हा जेव्हा तुम्हाला मागे खेचेल त्या त्या वेळी यशाकडे जाण्याची तुमची तीव्रता वाढत असते. त्यामुळे अपयशाने खचून न जाता आत्मविश्वासाने यश प्राप्त करावे असे आवाहन त्यांनी केले. निवृत्त मंडळ अधिकारी पुंडलिक आंधळे अध्यक्षस्थानी होते.
वंजारी समाजातील गुणवंताचा केला सत्कार
यावेळी प्रा.वा.ना.आंधळे यांनी गुणवत्तेमुळे समाजाची ओळख होत असते.गुणवत्ता असेल तर प्रत्येक क्षेत्रात यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी समाजाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पाटील,पुंडलिक आंधळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देवून सत्कार करण्यात आला.वंजारी समाजाचे अध्यक्ष सुरेश सांगळे यांनी प्रास्तविक तर प्रवीण महाजन यांनी सूत्रसंचलन केले. उपाध्यक्ष रुपेश वंजारी, सचिव ज्ञानेश्वर वंजारी, विठ्ठल आंधळे, संचालक प्रवीण ढाकणे, प्रा.सुनील वंजारी, ईश्वर घुगे, संतोष वाघ, राजेंद्र घुगे, दिनेश घुगे, अक्षय गडकर, विलास वंजारी, सुनील घुगे, रवींद्र वाघ आदि उपस्थित होते.