माणूस हा अनेक बंधनात अडकलेला असतो. त्या बंधनापासून सुटका मिळवण्यासाठी माणसाने बंधनाला अनुसरुन अथवा बंधनाचा विचार करुनच यशाचा मार्ग अंगिकारावा. की ज्यामुळे वैचारिक शक्ती प्रचंड वाढेल. जीवनात मोठी व्यक्ती बनण्यासाठी लोक परीक्षेतील ‘गुण’ म्हणजेच यश मानतात. सातत्याने ते लोक गुण मिळवण्यासाठी धडपड करु लागतात. परंतु, अशी अनेक माणसे ‘जीवनावश्यक’ गुणांना विसरतात. जीवनावश्यक गुणांना अनुसरुन परीक्षेतील यश मिळवणे उत्तम राहील. म्हणूनच, माणसाने यश मिळवण्यासाठी गुणवान व्हावे, तेव्हाच यश मिळविण्यास सिद्ध व्हावे. गुणांना अनुसरुन यश मिळवणे नेहमी उत्तमच !
गुणवान बनण्यासाठीच्या आठ पायर्या या पुस्तकात दिल्या आहे. गुणवान न होता माणूस त्याच्या जीवनात विकास करु शकत नाही.
पूर्ण जगाचा विचार करता फक्त एक-दीड टक्का लोक गुणवान आहेत, त्यामुळे या जगात अंधःकार दाटलेला आहे या अंधःकारामुळेच वाईट आणि अतिवाईट लोक या जगात आहे. त्यामुळेच, हा अंधःकार दूर करण्यासाठी गुणवान बनणे आवश्यक ठरते. गुणवान व्यक्तींमुळे अतिवाईट व्यक्तीसुद्धा सुधारु शकते. भूतपूर्व काळात 99.9 % गुणवान असलेला एक महान पुरुष होऊन गेला. तो महान पुरुष म्हणजे ‘स्वामी विवेकानंद’ होय. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही ‘गुण’ असतातच तसेच, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दुर्गुणही असतातच. म्हणून पूर्णतः 100% गुणवान कोणीही असू शकत नाही. स्वतःतील दुर्गुण शोधून ते सुधारल्याने आपली गुणवान बनण्याची टक्केवारी 95% पेक्षा वाढू शकते. परंतु आपल्यातील सर्वच चुका कोणीही शोधू शकत नाही. या पुस्तकात अनेक गुणांचा उल्लेख केला आहे. त्या गुणांना अनुसरुन मनुष्य गुणवान बनू शकतो.
गुणवान बनण्यासाठीचे उपाय
‘अनुभवी शक्ती’ आणि ‘वैचारिक शक्ती’ या दोन शक्तींचा या पुस्तकात प्रामुख्याने उल्लेख केला गेला आहे. एखाद्या वाईट व्यक्तीजवळ ह्या शक्त्या असल्या, तर त्या या शक्तींमार्फत खूप मोठे स्वप्न साकारु शकतो. तो नंतर स्वतःहूनच गुणवान होण्यास तयार होतो आणि या महत्त्वाच्या दोन शक्तींमुळेच वैज्ञानिकांनी अनेक शोध लावले आहे. म्हणून, त्या दोन शक्तींमुळे जग वर आले आहे, असे माझे ठाम मत आहे. त्यामुळेच अनुभवी शक्ती व वैचारिक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढवणे गरजेचे ठरते. अनुभवी शक्ती आणि वैचारिक शक्ती या दोन शक्तींमुळेच मी हा गुणवान बनण्याचा मार्ग माहीत करु शकलो आहे. हाच वरील मार्ग पुढील पुस्तकात सविस्तरपणे सांगितलेला आहे.
– मोहित खाचणे.
इयत्ता. 10 वी, ए.टी. झांबरे विद्यालय/ जळगाव
8856831442