गुन्हेगारांचे त्रिकूट जिल्ह्यातून चले जाव : जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश

Attal Three criminals of Raver Banished From The District For Six Months जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षकांनी रावेरातील त्रिकूटाला जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. जावेद शेख लुकमान (27), सादिक शेख लुकमान (23), सद्दाम शेख लुकमान (20, हत्तेहनगर, पाण्याच्या टाकीजवळ, रावेर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.

टोळीविरोधात अनेक गुन्हे
त्रिकूटांच्या टोळीविरोधात दंगल, हाणामारी कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचे एलसीबी निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी कळवले आहे.