गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई प्रस्तावीत

0

भडारा । जिल्ह्यातील महत्वाचे शहर मानले जाणार्‍या तुमसर शहर आणि उपविभागात डीजेमुक्त गणेश विसर्जन करण्यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी 66 गुन्हेगारांवर तडीपाराची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, दंगा करणार्‍या 100 जणांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी दिली.

डीजेमुक्त गणपती तसेच येणार्या सणांमध्ये तणाव वाढू नये, जातीय सलोखा कायम राहावा. तसेच पोलिसांचे नागरिकांशी चांगले संबंध निर्माण व्हावे, यासाठी तुमसर पोलिसांनी दंगा काबू योजना अंमलात आणली आहे.