अंडापाव विक्रेत्या तरुणाच्या खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाचा निकाल ; एकाची निर्दोष मुक्तता
जळगाव- पूर्ववैमनस्यातून अंडापाव विक्रेता चंद्रकांत उर्फ भैय्या सुरेश पाटील (रा.गणेशवाडी) याचा 15 मे 2015 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास सहा जणांनी खून केल्याची घटना तुकारामवाडीत घडली होती. या खटल्यात जिल्हा न्यायालयाने गुन्हेगार चिंग्या उर्फ चेतन सुरेश आळंदे (28, रा.गणेशवाडी) याच्यासह बोबड्या उर्फ गोल्या उर्फ लखन दिलीप मराठे (20, रा.शिवाजी नगर), सागर वासुदेव पाटील (20, रा.ईश्वर कॉलनी), सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (21, रा.गाडगेबाबा नगर), सोन्या उर्फ सोनू उर्फ ललीत गणेश चौधरी (20, रा.हरेश्वर कॉलनी) या पाच जणांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर यातील लक्ष्मण उर्फ लक्ष्या दिलीप शिंदे (22, शिवाजी नगर), याची निर्दोष मुक्तता केली आहे. शनिवारी जिल्हा व प्रमुख सत्र न्या. गोविंद सानप यांनी हा निकाल दिला. कामकाजादरम्यान न्यायालयात तसेच न्यायालयाबाहेर आरसीपी प्लाटून, क्यूआरटी पथकासह पोलिसांना मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैना त करण्यात आला होता.
सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल केतन ढाके यांनी खटल्यात काम पाहिले. त्यांनी केलेला प्रभावीपणे युक्तीवाद व पुरावे तसेच साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरुन न्या. सानप यांनी चिंग्या उर्फ चेतन सुरेश आळंदे याच्यासह बोबड्या उर्फ गोल्या उर्फ लखन मराठे , सागर पाटील (20, रा.ईश्वर कॉलनी), सनी उर्फ चाळीस , सोन्या उर्फ चौधरी (20, रा.हरेश्वर कॉलनी) या पाच जणांना भादंवि कलम 302, 102 ब, 149 यानुसार सश्रम जन्मठेप, प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास साधा कारावास, चिंग्यासह पाचही जणांना कलम 307, 120 ब, 149 नुसार 5 वर्ष कारावास, 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने कारावास, तसेच कलम 143,149, 323 नुसार 2 महिने कारावास पाचही जणांना सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. तर यातील लक्ष्मण उर्फ लक्ष्या शिंदे याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली