गुन्हे उघड करा अन्यथा डिबी सोडा

0

जळगाव। जळगाव शहरात दिवसागणिक मालमत्तेच्या गुन्ह्यात वाढ होत आहे, त्या तुलनेत गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या गुन्हे शोध पथकाला (डी.बी.पथक) गुन्हे उघडकीस आणण्याशिवाय अन्य दुसरे काम नाही, त्यामुळे आपआपल्या हद्दीत दाखल गुन्हे उघडकीस आले नाहीत तर गुन्हे पथकातून कर्मचाजयांची गच्छंती करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिला.

चांगले कार्य करणार्‍यांचा गौरव
चांगले काम करणाजया कर्मचाजयांचा मात्र गौरव केला जाईल, असे पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात गुरुवारी जळगाव उपविभागातील गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाजयांची तसेच प्रभारी अधिकाजयांची बैठक झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे उपस्थित होते. अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शहरातील गुन्हे शोध पथकाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. कराळे यांनी प्रत्येक कर्मचाजयाची वैयक्तिक कामगिरी तपासली. कोणत्या कर्मचाजयाकडे किती गुन्हे आहेत, त्यापैकी किती गुन्हे निकाली निघाले व किमती गुन्हे प्रलंबित आहेत व प्रलंबित राहण्याचे कारणे काय आदी माहिती घेण्यात
आली.