नवी दिल्ली: अनेक राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला उमेदवारी दिली जाते. अनेकदा तो उमेदवार निवडून देखील येतो. त्यामुळे नागरिकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीबद्दल चीड निर्माण होते. दरम्यान याची आता सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. विविध गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली, याची कारणे पक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.