सांगवी : चोरीच्या संशयावरून कामगाराला ताब्यात घेऊन अमानुष मारहाण करत खंडणी मागितल्या प्रकरणी पिंपरी-चिचंवड गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान फरार आरोपींपैकी एकाला पिंपरी पोलिसांनी गुरुवारी (दि. 13) सायंकाळी औंध येथे राहत्या घरातून अटक केली. किरण लांडगे (वय 40, रा. औंध) असे अटक केलेल्या पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. त्याचे साथीदार रमेश गबाजी नाळे (वय 56, रा. सिंहगडरोड, धायरी) व राजू त्र्यंबक केदारी (वय 49, रा. कावेरीनगर, वाकड) अद्याप फरार आहेत. तपासात आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.
मुद्देमाल सापडला नाही
हे देखील वाचा
आरोपी नाळे व त्याच्या सहकार्यांना मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरणार्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. तरुणाकडे चौकशी करुन बेदम मारहाण केली. तसेच त्याला विजेचा शॉक देखील दिला होता. चौकशीमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाकडे काहीच मुद्देमाल सापडला नाही. नाळे यांनी तरुणाला ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करुन तरुणांकडून आठ लाख रुपये घेतले. तसेच नाळे यांनी केलेल्या कारवाईची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना दिली नव्हती. तरुणाच्या नातेवाईकांनी वकिलांमार्फत पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडे दाद मगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. त्यातील नाळे व यांचा अटकपूर्व जामीनअर्ज देखील कोर्टाने फेटाळला होता. दरम्यान यातील आरोपी लांडगे हा औंध येथे असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली.