धुळे । नूतन पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी रविवारी धुळे जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी त्यांनी पोलीस अधिकार्यांना चांगलाच दम भरला. आपल्या पोलीस ठाण्यांतर्गत अवैध धंदे पुर्णपणे बंद करण्याच्या सुचना करतांनाच गुन्हे प्रतिबंधासाठी प्रयत्न करणे, गुन्हा घडलाच तर प्रभारी अधिकार्यांनी घटनास्थळी हजर असणे, अशी तंबीच अधीक्षक एम. रामकुमार यांनी दिली.
चैतन्या एस.यांना निरोप
पोलीस अधीक्षक चैतन्या यांच्या निरोप संमारंभाप्रसंगी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच अधिकारी उपस्थित होते. यावेळी एम.रामकुमार यांनी बोलतांना सांगितले की, जिल्ह्यात सामाजिक शांतता व गुन्हे रोखण्याला प्राधान्य देणार आहोत. जिल्ह्याची माहिती घेऊन गुन्हे रोखण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात येईल. चैतन्या यांनी जे चांगले काम केले आहे. ते पुढे सुरुच ठेवणार
आहोत.
…तर अधिकार्यांवर कठोर कारवाई
जिल्ह्यासह शहरात ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरु असतील ते तात्काळ बंद करावेत. कुठेही अवैध धंदे सुरु असल्याचे आढळून आल्यास त्या पोलीस ठाण्याच्या अधिकार्यास जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच एखादा गंभीर गुन्हा घडल्यास त्या भागातील प्रभारी अधिकार्याने घटनस्थळी हजर असणे आवश्यक आहे. त्यांनी तात्काळ गुन्ह्याशी संबंधित आरोपींना अटक करावे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नये. कामात कसूर करणार्या अधिकार्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच अधीक्षक रामकुमार यांनी अधिकर्यांना दिली.