गुप्टिलची धडाकेबाज शतकाने न्यूझीलंडचा विजय

0

हेमिल्टन : आक्रमक सलामीवीर मार्टिन गुप्टिलच्या धमाकेदार नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट्सने पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. गुप्टिलच्या 138 चेंडूतील नाबाद 180 धावांच्या तडाखेबंद खेळीच्या बळावर चौथ्या वन-डेत न्यूझीलंडने द. आफ्रिकेवर 7 विकेटनी सहज मात केली. द. आफ्रिकेला 8 बाद 289 वर रोखल्यानंतर न्यूझीलंडने हे टार्गेट 45 षटकांत 3 बाद 280 धावा काढून पूर्ण केले.

कारकिर्दीतील 12 वे शतक साजरे करताना गुप्टिलने 15 चौकार आणि 11 षटकार खेचत द. आफ्रिकन गोलंदाजीची वाट लावली. केन विल्यमसनसह (21) दुसर्‍या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केल्यानंतर गुप्टिलने रॉस टेलरसह (97 चेंडूत 66) तिसर्‍या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी करीत सोपा विजय साजरा करून दिला. द. आफ्रिकेच्या इम्रान ताहीरने 56 धावांत 2 विकेट घेतल्या.

प्रथम फलंदाजी करणार्‍या द. आफ्रिकेकडून फाफ डु प्लेसिस (97 चेंडूत 67) आणि कर्णधार ए. बी. डीविलियर्स (59 चेंडूत 72) यांनी अर्धशतके साजरी केली. 2 बाद 128 असा चांगला प्रारंभ केल्यानंतर द. आफ्रिकेने मधल्या फळीतील चार फलंदाज 30 धावांत गमावले. त्यामुळे एकवेळ त्यांची अवस्था 6 बाद 158 अशी झाली होती. ख्रिस मॉरिस (28) आणि वायने पर्नेल (29) यांनी शेवटच्या 8 षटकांत 80 धावा ठोकल्याने द. आफ्रिकेला अडीचशेचा टप्पा पार करता आला.