नांदेड । शहरातील खडकपूरा परिसरात एका 6 वर्षीय बालकाची गुप्तधनासाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. शेख शोएब असे बालकाचे नाव आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी त्याची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खडकपुरा भागातील शेख शोएब शेख सलीम हा बालक 3 मार्च 2018 पासून गायब होता. त्यानंतर 4 मार्चला त्याचा मृतदेह एका जुनाट शौचाल यामध्ये सापडला. त्या बालकाची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार त्याच्या डोक्यात जखम असल्याने त्या बालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.