गुप्तधन व पैश्यांचा पाऊस पाडणारी टोळी गजाआड

0

निजामपूर। गुप्तधन कोठे आहे असे दाखवणारे अँटीक पीस देतो असे सांगून जबरी चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात लागली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक रामकुमार,अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे,एस डी पी ओ धुळे ग्रा. निलेश सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी ,कर्मचारी यांनी जामदा परिसरातील अंधश्रद्धाच्या भूलथापा देऊन लूटमार करणारी टोळी जेरबंद केली आहे. नाशिक येथील अमोल धोंडगे याला जामदा येथील आरोपितांनी गुप्तधन दाखवणारे भांडे देतो असे अमिश दाखवून जामदा परिसरात बोलाविले. गुप्तधनाचे आमिष दाखवून गरीब व भोळ्या जनतेला अशा प्रकारे फसविण्याचा गोरखधंदा सुरु आहे. अशा फसव्या गोष्टींकडे  नागरिकांनी चाणाक्षपणे बघत अशा गोष्टींना भुलू नये अशी चर्चा जनमानसात होत आहे.

पैसे व ऐवज जबरीने चोरण्याचा प्रयत्न  या टोळीने त्यांना निर्जन ठिकाणी नेऊन त्याचेकडील पैसे व ऐवज जबरीने चोरण्याचा प्रयत्न केला होता.सदरबाबत निजामपूर पोस्टेचे सपोनी राहुल पवार यांना माहिती मिळताच त्यांनी सोबतचे पीएसआय सुरवाडे, पोलीस हवालदार  कोकणी,लोहार,शिरसाठ,पोशी सूर्यवंशी,नितीन अहिरे यानी या टोळीला जबरी चोरी करताना जागीच पकडले व दोन आरोपी दिलीप पवार ,इकबाल चव्हाण दो. रा. जामदा याना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि ,निजामपूर परिसरात गुप्तधन दाखविणारे मांडूळ, साप,नागमनी,अँटीक पीस देण्याचे अमिश दाखवून येथे बोलावून जबरी चोरी करणार्‍या टोळ्या कार्यरत आहेत. तरी या भूलथापांना बळी पडू नये.

सपोनि राहुल पवार ,निजामपूर पोलीस स्टेशन,धुळे