गुप्तांगावर हल्ला करीत तरुणाचा खून : मयत चोपडा तालुक्यातील रहिवासी

The murder of a 30-year-old youth in Akulkheda Village ! चोपडा : मध्यप्रदेशातील मूळचा रहिवासी असलेल्या मात्र सध्या चोपडा तालुक्यातील अकुलखेडा स्थित 30 वर्षीय तरुणाची गुप्तांगावर हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञाताविरोधात या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल आला. दिनेश वेरसिंग सस्ते (पावरा, 30, रा.पिसनाबल, ता.सेंधवा, जि.वडवणी, ह.मु.अकुलखेडा, ता.चोपडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

खून करून मृतदेह फेकला
या संदर्भात मयताचा भाऊ दिलीप वेरसिंग सस्ते (पावरा) यांनी फिर्याद दिली असून रविवार, 2 ऑक्टोंबर 2022 रोजीच्या सायंकाळी 4.30 ते सोमवार, 3 ऑक्टोंबरच्या सकाळी 10.30 वाजेपूर्वी अज्ञाताने भाऊ दिनेश सस्ते (पावरा) याचा खून केला. दिनेशचा मृतदेह अकुलखेडा गावाजवळ संकेत हॉटेल समोर असलेल्या पाटाच्या चारीजवळ मिळून आला होता. दिनेशच्या गुप्तांगावर गंभीर दुखापत आढळली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करीत आहेत.