गुप्ती मारुन ट्रक चालकाला लुटणार्‍यांना अटक

0

चाळीसगाव – ट्रक चालकाला थांबवून त्यास चालता ट्रकमध्ये बसून त्यास मारहाण करून पैसे लुटण्याची घटना शनिवारी मध्ररात्रीस घडली. कन्नड रोडवरील रांजणगाव फाट्याजवळ ही घटना घडली होती. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र एक आरोपी फरार झाला असून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अकाश सुभाष सारवाण(20), दीपक जगदीश गोयर (20) दोघे मेहतर कॉलनी, गिरीश मधुकर चव्हाण(24) आंबेडकर चौक धनंजय वाल्मिक जाधव, सेंट्रल नाका यांनी रांजणगाव फाट्याजवळ ट्रक थांबवला लुटण्राचा प्ररत्न केला.

दीपक गोयर याने चालक राहुल भगवान सोनार यांच्या गळ्याला चाकू लावून पैशाची मागणी केली तर अकाश सारवाण याने मारहाण करुन जखमी केले. चौघे आरोपी मोटारसायकलवर बसून पळून गेले. चालकाने मोटारसायकल नंबर दिल्याने त्राच भागात गस्त घालणारे सहाय्रक फौजदार प्रकाश पाटील, पो.कॉ. ज्ञानेश्‍वर बडगुजर, शंकर जंजाळे, हिराजी देशमुख रांनी आरोपींना ताब्रात घेतले. तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 23 पर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक रामेश्‍वर गाडे पाटील यांनी दिली. पोलीस उपअधीक्षक अरविंद पाटील, पो.नि.रामेश्‍वर गाडे पाटील, स.पो.नि.दिपक बोरसे, पो.उ.नि.प्रदिप वाल्हे रांनी गस्त घातली.