गुरव समाजातर्फे 34 बटुंची करण्यात आली मौंज

0

भुसावळ। येथील गुरव समाज शैक्षणिक, सांस्कृतिक उन्नती मंडळातर्फे सामुहिक उपनयन संस्कार कार्यक्रम संतोषीमाता सभागृहात उत्साहात पार पडला. यामध्ये जिल्ह्याभरातील 34 बटुंची मौंज करण्यात आली. सकाळी धार्मिक विधींना सुरुवात होवून 11 वाजता पुजा, अर्चना, अभिषेक, महाआरती होवून कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी माजी आमदार संतोष चौधरी यांनी गुरव समाजासाठी सभागृह जागा देण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. शिंदे, सामाजिक कार्यकर्ते जे.बी. कोटेचा, कार्यकारी अध्यक्ष मोहन गुरव, महेश शिर्के, संजय घोडके, अनिल तोरणमल आदी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शाम शिर्के, हभप अनंत चिंचोलकर, विजय शिंदे, आनंद कळमकर, ज्योती कळमकर, पल्लवी गुरव, अलका सावदेकर, संतोष चिनावलकर, उमा कासोदेकर, प्रभादेवी अग्रवाल, विनोद वाघे, मंगेश शिंदे, भालचंद्र ओगले, मधुकर पारसे, प्रकाश पाडळसेकर, बाळकृष्ण अडावदकर, प्रविण भंबाळकर, रविंद्र शिरसोलीकर, भानुदास गुरव, योगेश शेंडे, किशोर भादलीकर, राजेंद्र चिनावलकर, श्रीराम अडावदकर, उदय भादलीकर, जीवन शेंडे, श्रीराम उत्राणकर आदींनी परिश्रम घेतले.