गुरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक : 12 गायींची सुटका

पूरनाड फाट्याजवळ चौघे कारवाईच्या कोठडीत

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक करणार्‍या ट्रकमधील 12 गायींची सुटका केली असून या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पुरनाड फाट्याजवळ ट्रक क्रमांक (एच.आर. 55 डब्ल्यू.8561) मधून गायींची अतिशय निर्दयीपणे वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास ट्रक अडवल्याने चालकासह चौघे जण ट्रक टाकून पळण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली तर ट्रकमधील 12 जर्सी गायींची सुटका करून पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त करण्यात आला.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
पोलिसांनी या प्रकरणी या ट्रक चालक साबीर इस्माईल (रा.बुराका, जिल्हा नुह, हरीयाणा), अब्दुल सत्तार अब्दुल गफार (मावना, जि.किठोर, उत्तर प्रदेश), वसीम आस मोहम्मद (सयीदपूर, मोदी नगर, उत्तरप्रदेश), साहिल खान सपात खान (पोटला तह, नूह, उत्तर प्रदेश) यांना अटक केली तर अंकुश बाविस्कर यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेवाळे, हवालदार जवरे, अंकुश बाविस्कर, धर्मंद्र ठाकूर यांच्या पथकाने केली.