गुरांची निदर्यतेने कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक : तीन गुरांचा मृत्यू : 25 गुरांची सावदा पोलिसांनी केली सुटका

Traffic of cattle with intent to slaughter near Savada, Stopped : Eicher Vehicle seized: 25 cattle rescued सावदा : सावदा पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने होणारी गोवंशाची वाहतूक रोखत ट्रक जप्त केला असून त्यातील 25 गुरांची सुटका केली आहे तर दाटी-वाटीने झालेल्या वाहतुकीमुळे तीन गुरांचा मृत्यू झाला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मंगळवारी दुपारी चार वाजता रावेरकडून सावद्याकडे येणारा देहराडून पासिंगचा आयशर (डी.डी.01 जी.9350) मधून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती निंभोरा पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक धुमाळ व सहकार्‍यांनी वडगावजवळ गाडी अडवली मात्र वाहन न थांबवल्याने सावदा पोलिसांना माहिती दिल्यानंतर सावदा शहराबाहेर हॉटेल महेंद्रजवळ वाहन अडवण्यात यश आले मात्र चालकासह क्लिनर पसार झाला.

तीन गुरांचा निर्दयी वाहतुकीमुळे मृत्यू
वाहनातून पोलिसांनी 28 गोर्‍हे ताब्यात घेतले असून त्यातील तीन मयत आढळल्याने त्यांच्यावर दफनविधी करण्याात आला तर अन्य 25 गुरांची जळगावच्या गो शाळेत रवानगी करण्यात आली. सावदा पोलिसांनी आयशर ट्रक जप्त केला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले, सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक सिद्धेश्‍वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान गायकवाड, हवालदार जयराम खोडपे, यशवंत टहाकळे, किरण पाटील, रुस्तम तडवी आदींच्या पथकाने केली.