गुरांची निर्दयीपणे वाहतूक : चार गुरांची सुटका

Traffic of Cattle; Rescue of four cows: Accused escapes on seeing the crowd जळगाव : गुरांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणार्‍या वाहनावर शनीपेठ पोलीसांनी कारवाई केली तर जमाव पाहताच आरोपी चालकाने पलायन केले. वाहनातील चार गुरांची सुटका करण्यात आली. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नागरीकांच्या सतर्कतेने वाहन पकडले
जळगाव शहरातील रथ चौक ते पांझरपोळ रोडवरील भावसार मढीजवळून शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास (एम.एच.19 एस.7157) या वाहनातून दोन गायी व दोन वासरू यांची कोंबून निर्दयीपणे वाहतूक होत असताना नागरीकांच्या सतर्कतेने वाहन पकडण्यात आले. दरम्यान, पोलिसांचा जमाव पाहून चालक वाहन सोडून पसार झाला. शनीपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहन ताब्यात घेतले तर चारही गुरांची सुटका करण्यात आली आहे.

शनीपेठ पोलिसात गुन्हा
याबाबत शुक्रवार, 19 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता पोलीस नाईक अभिजीत सैंदाणे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक योगेश माळी करीत आहे.