चाळीसगाव । गाय व तीन गोर्हे यांना निर्दयतेने कोंबून विना परवाना छोटा हत्ती मधून घेऊन जाणार्या तिघांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चाळीसगाव तितूर नदीच्या पुलावर पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले असून त्यांचेकडून 1 लाख 23 हजार रूपये किमतीचे वाहनासह 1 गाय 3 गोर्हे शहर पोलीसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता दिली उडवाउडवीची उत्तरे
चाळीसगाव शहरातील तितुर नदीच्या पुलावर 14 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास टाटा एस छोटा हत्ती (एम.एच. 04 डी.के 2832) मध्ये काही गुरे संशयीत रित्या भरलेली असल्याचे दिसल्यावरून बजरंग दलाच्या कार्यकत्र्यांनी सदर वाहन अडवून त्याची पाहणी केली असता, त्यात 1 गाय व 3 गो-हे निर्दयतेने कोंबून त्यांना यातना होती अशा पध्दतीने भरलेले होते व ती जनावरे कोठे घेऊन जात आहात, याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने त्या कार्यकर्त्यांनी सदर वाहन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन वाहतूक शाखेचे हवालदार राजेंद्र चित्ते यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीसात शेख मुज्जफर शेख अहमद, शेख युनूस शेख गफूर दोघे रा. नगरपालिका मंगल कार्यालयाजवळ हुडको चाळीसगाव व गुरे मालक तात्या काशिनाथ निकम रा. धामणगाव ता. चाळीसगाव या 3 जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीसात प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा घेवून गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून टाटा एस छोटा हत्ती वाहनासह 1 गाय, 3 गोर्हे असा एकुण 1 लाख 23 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोउनि प्रशांत दिवटे करीत आहे.