वाघोडनजीकची घटना ; जप्त वाहनांचा मध्यप्रदेश पोलिसांकडे ताबा
रावेर : मध्य प्रदेशातून गुरांची वाहतूक करणारे दोन ट्रक बर्हाणपूर गावानजीक पोलिसांनी पकडले तर पाठीमागून या गुरांची वाहतूक करणारेदेखील व्यापारी येत असल्याने पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत वाघोड गावाजवळ पोलिसांना पाहताच या व्यापार्यांनी वाहन सोडून अक्षरशः धूम ठोकली. चारचाकी मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.
कत्तलीच्या इराद्याने गुरांच्या वाहतुकीचा संशय
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात कत्तलीच्या इराद्याने गुरे वाहून नेणारे दोन ट्रक मध्यप्रदेश पोलिसांनी सोमवारी सकाळी पकडले होते तर या ट्रकमागेच त्यांचे व्यापारी खाजगी वाहनातून येत असल्याची माहिती मध्यप्रदेश पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना दिल्यानंतर वाघोड येथे नाकाबंदी करण्यात आली. पांढर्या रंगाची भरधाव चारचाकी (एम.पी.09 बीडी 4682) वाघोडजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ आल्यानंतर नाकाबंदीची कुणकुणली लागलेल्या व्यापार्यांची भंबेरी उडाल्याने त्यांनी धूम ठोकली. फौजदार गजेंद्र पाटील, पोलीस कॉस्टेबल हरीलाल पाटील, शैलेश चव्हाण, जाकिर पिंजारी यांनी चारचाकी ताब्यात घेत अधिक कारवाईसाठी ती मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिली.