रावेर । संत शिष्याच्या जिवनाचे कल्याण करतात. तर गुरु भक्तीत निष्ठा आणि श्रद्धा असली तर शिष्याला परमात्म्याचे दर्शन घडते, असे विचार गोपाल चैतन्यजी महाराज यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त पाल येथील वृंदावन धाम आश्रमात आयोजित गुरू महोत्सवात ते बोलत होते.
परराज्यातील भाविकांची उपस्थिती
गुरूच्या सहवासाने आत्मशुद्धी होते. त्यामुळे सांसारिक सुखांचा मोह दूर होऊन अध्यात्माची गोडी लागते. त्यामुळे शांती प्राप्त करण्यासाठी गुरूचा सहवास आवश्यक असतो, असे गोपालचैतन्य महाराज यांनी सांगितले. महोत्सवाला चैतन्यसाधक परिवारातील मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, छात्तीसगड महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील साधक उपस्थित होते.
15 हजार शिष्यांनी घेतला दर्शनाचा लाभ
वृंदावन धाम आश्रमाचा परिसर साधकांच्या गर्दीने फुलला होता. सुमारे 15 हजार शिष्यांनी दर्शनाचा लाभ घेतला. रविवारच्या कार्यक्रमात गुरु पौर्णिमेनिमित्त साधकांना दिक्षा देण्यात आली. यावेळी भिकनगांवचे आमदार झुमा साळुंके, खंडव्याच्या खासदार नंदा ब्राम्हणे, माजी आमदार शिरिष चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.