गुरुजनांचा सन्मान ही आपली संस्कृती

0

बारामती । आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे. व्यसनापासून दूर राहून प्रत्येकाने निरोगी जीवन जगण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. आई-वडिल, गुरुजनांचा सन्मान ही आपली संस्कृती आहे, असे मत सदानंद महाराज माहुरकर यांनी व्यक्त केले. स्व. तुकाराम यादवराव बालगुडे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त एच. व्ही. देसाई हॉस्पिटलच्या वतीने बारामती तालुक्यातील बालगुडेपट्टा येथे सदानंदमहाराज माहुरकर यांचे प्रवचन, तसेच मोफत नेत्र तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या शिबिरामध्ये नेत्रतज्ज्ञांनी सुमारे 250 हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करून मार्गदर्शन केले. यामध्ये आठजणांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर हडपसर-महंदवाडी येथे एच.व्ही. देसाई रुग्णालयामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. एच.व्ही, देसाई हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. व्ही. पी. अंदूरकर, शिबीर समन्वयक जितेश खरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शरद शिंदे यांनी नेत्रतपासणी केली. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अशोक बालगुडे, सदाशिव बालगुडे, बालाजी बालगुडे, फक्कड बालगुडे यांनी केले होते. सूत्रसंचालन सर्जेराव बोराडे आणि सूनील बालगुडे यांनी केले. सर्जेराव बालगुडे, सोपाना बालगुडे, जयसिंग बालगुडे, महादेव बालगुडे, भगवान बालगुडे, राजाराम बालगुडे, रामदास बालगुडे, बाळासाहेब भगत, कालिदास बालगुडे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.