गुरुजी ‘हीच’ का तुमची शिकवण?; जितेंद्र आव्हाडांचे भिडे गुरुजींना प्रश्न

0

मुंबई- नालासोपारा येथे सापडलेल्या स्फोटक प्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हिंदू कट्टरपंथीयांच्या हिटलिस्टमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर, श्याम मानव आणि रितू राज यांचा समावेश होता, अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली. दरम्यान यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भिडे गुरुजी यांना लक्ष केले आहे.

मला मारण्यासाठी माझ्या घराची रेकी करण्यात आली होती असे आमदार आव्हाड यांनी सांगितले आहे. अविनाश पवार यांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, अगदी तो माझ्या घरापर्यंत येऊन गेला असे आरोप आव्हाड यांनी केले आहे.