जळगाव। आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी गुरुर्पोर्णिमा साजरी केली जाते. वर्षभरात ज्या काही 12-13 पौर्णिमा येतात त्यापैकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुच्या स्मृतीत सर्मर्पित केली जाते, याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा (व्यास पौर्णिमा) म्हणतात. भारतीय संस्कृतीत गुरुला-सदगुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा ब्रह्मा-विष्णु-महेश स्वरुप आहे. गुरु हा साक्षात परब्रह्म आहे असे मानले जाते. प्राचीन काळी विद्यार्थी गुरुच्या आश्रमात शिकण्यासाठी जात असत. त्या काळी अध्ययन-अध्यापनाची सुरुवात आषाढ महिन्यातील पौर्णिमेला होत असे. तेव्हा पासून गरुपूजनाचा, गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरु झाला. या दिवशी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या गुरुंना-शिक्षकांना भक्तिभावाने-आदराने फुले अर्पण करुन नमस्कार करतात व त्यांचे आर्शिर्वाद घेतात. दरम्यान गुरुपौर्णिमा शनिवारी प्रारंभ झाली असून जळगाव शहरातील धार्मिक मंदीरे, संस्थाने, संघटना यांच्यातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरू पूजनासह प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
शनिवारी झालेले कार्यक्रम
जुन्या जोशी कॉलनीतील निर्भय सद्गुरू सत्संग मंडळातर्फे गुरूगीता पारायण, गीतापाठ पारायण तसेच रात्री सुखदेव महाराज यांचे कीर्तन आयोजीत करण्यात आले होते. मुकुंदनगरातील दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा बालसंस्कार केंद्रात गुरूपूजन सोहळ्याला भूपाळी आरतीने सुरुवात झाले. औदुंबराला प्रदक्षिणा घालून सामुदायिक श्री स्वामीचरित्र पारायण तसेच महानैवद्याचा प्रसाद दाखविण्यात आला. ’स्वरवेध’फाउंडेशनतर्फे जानकी नगरातील सेवा केंद्रात ’आम्ही जाणू गुरूचे पाय’ हा दत्त प्रभुंवर आधारित भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम तर संस्कारभारतीतर्फे संत ज्ञानेश्वर मंदिरात गुरू पूजनासह भक्तिगातांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज होणारे कार्यक्रम
पंतावधुत मठी व अवधूत भजीनी मंडळातर्फे रविवारी दि. 9 रोजी श्री गुरु पौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. प.पु.सुधीरपंत बाळेकुंद्री यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. यावेळी ते मार्गदर्शन व बोधपर अशिर्वचन करणार आहे. अभिषेक, नित्यसेवा, नामस्मरण मौन नामस्मरण, भजनसेवा, गुरुपूजन, किर्तन सेवा, महाआरती व प्रसादाचे वाटप होणार आहे.
रक्तदान, वृक्षारोण
प्रताप नगरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात सकाळी 8.30 वाजेपासून तर रात्री 10.00 वाजेपर्यत गूरुपूजन करण्यात आले. तसेच गुरुमाऊली यांच्या आदेशान्वये केंद्रात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्रात सकाळ पासून फराळाचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्राला यात्रेचे स्वरुप आले होते. सिध्दीविनायक पार्क बहुउद्देशिय संस्थेतर्फे हरीओम नगर, सिध्दीविनायक पार्क परिसरात वृक्षारोपन सप्ताहानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी मनपा बांधकाम विभाग अधिकारी सुनिल तायडे, नाना सपकाळे, नगरसेवक शिवाजी वाघ, राजू मोरे, प्रदीप सोनवणे, नितीन मोरे, भगवान बाविस्कर, विनोद राणे, मनोज शिंपी, हेमंत व्यास आदी उपस्थित होते.