जळगाव । येथील सनातन संस्था शाखेतर्फे रविवार दि. 9 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता यश लॉन पिंप्राळा रोड येथे हा ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. गुरु परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती अन्य समविचारी संघटनासह यंदा देशभरात 101 ठिकाणी हे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरे करण्यात येणार आहे.
महिला सक्षमीकरणाची प्रात्यक्षिके होणार सादर
स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांनीही समाज, राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती दयनीय झाली आहे. आज नागरिकांना मुलभूत गरजा पूर्ण न होणे यासह भ्रष्टाचार, भेसळ, फसवणूक, शासकीय अनागोंदी आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जनतेचा छळ करणार्या लोकशाहीतील दुष्टप्रवृत्तींच्या विरोधात लढणे आणि ‘हिंदु राष्ट्र’ची स्थापना करणे ही काळानुसार श्रीगुरुसेवाचा आहे. या उद्देशाने या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’त लोकशाहीतील दृष्टप्रवत्तींच्या विरोधात न्याय मार्गाने कसे लढावे आणि आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याची आवश्यकता याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवात श्री. व्यासपूजन आणि गुरुपूजन सामाजिक क्षेत्रातील अधिवक्ता सुशील अत्रे यासह ‘सनातन संस्था’ हिंदु जनजागृती समितीचे वक्तेही आपले विचार मांडतील. महिला सक्षमीकरणाची प्रात्याक्षिके सादर होतील. तसेच ‘शौर्यजागरणाची आवश्यकता’ यावर मार्गदर्शन होईल.