भुसावळ। आपले परिवार सार्वजनिक वाचनालयातर्फे भुसावळ शहरासह तालुक्यातील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. 9 जुलैला गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून संतोषी माता हॉलमध्ये सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
प्रत्येक शाळा-महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवणार्या विद्यार्थ्यांसह वाचनालय सभासद पाल्यांचा गौरव होईल. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक, शिक्षक आणि संस्था पदाधिकार्यांचा सन्मान होईल. माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, सुरेश भोळे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे, नगराध्यक्ष रमण भोळे, सभापती सुनील महाजन उपस्थित राहणार आहेत. यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रमोद सरोदे, भालचंद्र इंगळे, प्रकाश चौधरी, शांताराम पाटील, अजय वाघोदे परिश्रम घेत आहेत.