जळगाव । ‘करी मनोरंजन जो मुलांचे! जडेल नाते प्रभुशी तयाचे!!’ असा सुविचार देणार्या साने गुरुजींच्या आईचे, यशोदाबाईंचे हे जन्मशताब्दीवर्ष. या निमित्ताने केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक शाळेने ‘ऐकावी नेटकी श्यामची आई’ हा 1ली ते 4थीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा उपक्रम हाती घेतला आहे.
शालेय विभागाचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी व शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील हा उपक्रम सुरु ठेवणार असून त्याचे नुकतेच उद्घाटन इयत्ता 4थी च्या 190 विद्यार्थ्यांच्या साक्षीने झाले. त्याप्रसंगी चंद्रकांत भंडारी यांनी विद्यार्थ्यांकडून समुहस्वरुपात म्हणून घेत गुरुजींची थोडक्यात ओळख करुन देत त्यांना ‘सावित्री-व्रत’ ही गोष्ट सांगितली. उपक्रमाबाबत मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी माहिती दिली.