गुरुवारी पाणी पुरवठा बंद

0

पुणे । महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती, वडगाव, लष्कर आणि होळकर पंपिंग येथील विद्युत आणि पंपिंग विषयक देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे या केंद्रातून शहराच्या बहुतांश भागाला होणारा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. चतुःश्रृंगी, एसएनजीटी, वारजे जलकेंद्राच्या परिसरातील पाणीपुरवठा मात्र सुरू राहणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणार्‍या भागांमध्ये पर्वती जलकेंद्राच्या अखत्यारीतील शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकूंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी आदी परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.