गुरुवारी विस्कळीत पाणीपुरवठा

0
निगडी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीापुरवठा विभागाकडून कृष्णानगर येथील पंप हाऊस येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 12) चिखली, तळवडे भागात विस्कळीत पाणीपुरवठा होणार आहे. कृष्णानगर येथील पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तेथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे संपुर्ण तळवडे भाग, संपूर्ण चिखली भाग. रामनगर, अजंठानगर, विद्यानगर या भागातील पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित राहील. त्याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.