गुरूग्राम-हरियाणाच्या गुरुग्राम येथे ४ मजली बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली. यात ५-८ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज गुरूवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास गुरूग्राम येथील उल्लावास गावात ही इमारत कोसळली. अडकलेले सर्वजण कामगार असण्याची शक्यता आहे.
घटनास्थळी एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इमारत कोसळण्यापूर्वी परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. ही इमारत कोसळल्याने आजूबाजूच्या इमारतींचंही नुकसान झालं आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे.