गुरूशिष्य पुण्यतिथी सोहळ्यासाठी चुंचाळे येथे राज्यभरातील भाविकांची गर्दी

0

यावल। तालुक्यातील चुंचाळे येथील रघुनाथ बाबा व त्यांचे शिष्य वासुदेवबाबा यांचा एकाच तिर्थावर वैशाख शुद्ध बारसला रविवार 7 रोजी साजर्‍या होणार्‍या पुण्यतिथी सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरातमधील भाविकांनी मोठी गर्दी केली आह़े रविवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास नगराज महाराज व सुरतचे दत्ता महाराज यांच्या हस्ते होम हवन व महाआरती करण्यात आली.

प्रसंगी समाधीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दरम्यान, चुंचाळे गाव सुकनाथबाबांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते. श्री सुकनाथ बाबा यांनी चुंचाळे गावात 12 वर्षे तपश्चर्या केली. श्री रघुनाथ बाबा यांचा जन्म चुंचाळे येथे झाला मात्र त्यांनी वड्री, ता.चोपडा येथे त्यांचे पिता श्री सुकनाथबाबांच्या मंदिराची निर्मिती केली. तेव्हापासून याठिकाणी राज्यासह शेजारील राज्यातील भक्तगण देखील दर्शनासाठी याठिकाणी येत असतात. या सोहळ्यामध्ये पहाटे 5 वाजता समाधी स्नान करण्यात येवून पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. यानंतर 6 वाजता मारुती अभिषक, 7 वाजता आरती, 11 वाजता होमहवन, दुपारी 12 वाजता महाआरती, सायंकाळी 7 वाजता आरती, रात्री 8 वाजता भजन व भारुड अशा कार्यक्रमांसह दुपारी 1 ते 3 पर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आला.