गुरू गोविंदसिंग यांची जयंती उत्साहात साजरी

0

जळगाव । शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांची 351 वी जयंती आज उत्साहात साजरी झाली. गुरुद्वार्‍यात सकाळी आठपासूनच शीख बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. निशाणसाहेब चोले दी सेवा’ (ध्वजारोहन) अत्यंत उत्साहात झाली. तसेच शिखबांधवांनी दरबार साहेबात मथ्था टेकला’ आणि गुरू गोविंदसिंग यांच्या पालखीचे दर्शन घेतले.

आर. आर. शाळेजवळील गुरूद्वार्‍यात आज सकाळी दहाला पुणे येथील कीर्तनकार छप्परसिंग, जळगावचे गुरुप्रीतसिंग यांच्या भजन-कीर्तनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. दुपारी बारा वाजता गुरू दा लंगर’मध्ये वाहे गुरू गोविंदसिंग’, सतनाम श्री वाहे गुरू’, वाहे गुरू दा प्रसाद’ असे नामस्मरण भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला. शहरातील अन्य धर्मांतील लोकांनीही हजेरी लावली. हिंदू बांधवांनी लक्षणीय संख्येने गुरू गोविंदसिंग यांच्या पालखीचे दर्शन घेतले. कार्यक्रमातही सहभाग नोंदवला. रात्री दहा वाजता कीर्तन व संगीतमय कार्यक्रम झाला. मध्य रात्री गुरू गोविंदसिंग यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

शहरात आज मिरवणूक
गुरू गोविंदसिंग यांच्या जन्मोत्सव नंतर मंगळवारी 26 रोजी दुपारी तीन वाजता आर. आर. शाळा जवळील गुरुद्वारा येथून गुरू गोविंदसिंग यांच्या प्रतिमा असलेली शोभायात्रा काढली जाणार आहे. तसेच शोभायात्रेत पंचप्यारे’ असतील. शहरातील विविध भागात शोभायात्रा काढून गुरुद्वार्‍यात शोभायात्रेचे समारोप होणार आहे.